पोस्ट्स

कान्हापुरीच्या सरपंचपदी प्रेम चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र शिंदे बिनविरोध

इमेज
पंढरपूर/प्रतिनिधि: कान्हापुरी ता.पंढरपूर या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रेम रघुनाथ चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र सुखदेव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.जी.महामुनी, ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब यांनी काम पाहिले.       पंढरपूर तालुक्यात लक्ष लागुन राहिलेल्या कान्हापुरी ग्रामपंचायत मध्ये मतदारांनी जुन्या पुढार्याना डावलुन युवा पिढीकडे मतदान रूपी सत्ता हातात दिली.सरपंचपदी युवक नेते प्रेम चव्हाण यांची निवड झाल्याने ग्रामस्थांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. कोमल दयानंद शिंदे, राणी दिपक फराडे, गोकुळ गिरआप्पा पाटील, मैहबुब रसुल देशमुख यांचेसह माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव शिंदे, माजी सरपंच रघुनाथ चव्हाण, गणपत फराडे, कुमार शिंदे, कासम देशमुख, युवराज चव्हाण, अनिल पवार, नितिन चव्हाण, लक्ष्मण गायकवाड, महादेव मुंडफुणे, महादेव कारंडे, ईश्वर काळेल, रमेश शिंदे, ईश्वर शिंदे, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी नुतन सरपंच, उपसरपंच, नुतन सदस्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांचा करण्यात आला....

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण नव्याने काढण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

इमेज
पाच गावातील नागरिकांनी चुकीच्या  आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात घेतली होती धाव पंढरपूर / प्रतिनिधि :  पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण  २७ जानेवारी रोजी काढणेत आले होते. या चुकिच्या आरक्षणाबाबत तालुक्यातील सुपली, गादेगाव, उंबरे पागे, उपरी, नारायण चिंचोली,  गावातील नागरिकांनी अॅड विजय जाधव यांचे वतीने  मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत आरक्षण बदलण्याची मागणी केली होती . यावर जिल्हाधिका-यांनी सुनावणी घेणेचे आदेश न्यायालयाने दिले होते.     सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सुनावणी पुर्ण केली. सुनावणी दरम्यान देखील सुपली, गादेगाव, उंबरे पागे, उपरी, नारायण चिंचोली चे आरक्षण बदलण्याचा युक्तिवाद अॅड विजय जाधव यांनी केला.  जिल्हाधिकारी यांनी    पंढरपूर तालुक्यातील अनुसुचित जमाती व अनुसुचित जमाती महिलेसाठी काढणेत आलेले आरक्षण कायम‌ केले आहे. माञ अनुसुचित जाती, ना.मा. प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी नव्याने आरक्षण काढणेचा आदेश दिला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील आरक्षण बदलणार असुन दि २२ फेब्रुवारी रोजी नव्यान...

पंढरपूर जवळ भिषण अपघात....चार जणांचा जागीच मृत्यू ... एक गंभीर जखमी

इमेज
मयत कोल्हापुर जिल्ह्यातील पंढरपूर / प्रतिनिधि : पंढरपूर - सांगोला रोडवरील ७ वा मैल कासेगावजवळ आज सकाळी सहा वाजता भिषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रुकवर बोलेरो जीप जावुन धडकलेने चार जणांचा जागीच मृत्यु झाला असुन एक गंभीर जखमी असलेची  माहिती तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलि.  सर्व मयत कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.    मयतामध्ये एक पुरुष, दोन महिला, एका लहान मुलीचा समावेश आहे.  एका गंभिर जखमीस उपचारासाठी पंढरपूर मध्ये दाखल करण्यात आले आहे.  घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पो नि किरण अवचर यांनी भेट दिली असुन अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस करीत आहेत

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व : माञ सुपलीतील सत्ता गमावली

इमेज
पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व : माञ सुपलीतील सत्ता गमावली पंढरपूर / प्रतिनिधि :  पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु झाली आहे. आतापर्यंत चार फे-यांची निकाल जाहिर झाले आहेत. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतीवर आ प्रशांत परिचारक गटाने सत्ता मिळवली आहे. माञ मागील पंचवार्षिकमध्ये सुपलीमध्ये परिचारक गटाची सत्ता असतानाही यावेळी एकही उमेदवार विजयी झाला नाही. सुपलीमध्ये आ भालके - काळे गटाचे ९ जागांवर विजय मिळवला आहे.     आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पेहे ग्रापंचायत परिचारक ५  आ बबनदादा शिंदे ४, उंबरगाव परिचारक गट ८ अपक्ष १, पोहोरगाव परिचारक ६, भालके - काळे ३, एकलासपुर परिचारक ६, भालके ३, केसकरवाडी परिचारक ६ भालके ३, आंबेचिंचोली परिचारक ६, शैला गोडसे २ अपक्ष १, भटुंबरे परिचारक ६, भालके ३, शेंडगेवाडी परिचारक - काळे ५, अपक्ष २, नळी परिचारक ६, भालके २, तनाळी भालके - परिचारक - काळे आघाडीचे ९ जागांवर विजय . नांदोरे बबनदादा शिंदे - भालके ५,  परिचारक - काळे ४, शिरगाव परिचारक, सांगवी बादलकोट लक्ष्मि...

विजयी उमेदवारांनी जल्लोष केल्यावर होणार कारवाई

इमेज
पंढरपूर / प्रतिनिधि : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत.  प्रत्येक गावातील भावकी - नातेवाईक - एकमेकांच्या विरोधात उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते.  उद्या दि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असुन यावेळी कायदा - सुव्यवस्था राखणेसाठी विजयी उमेदवारांना मिरवणुक व गुलाल उधळणेस जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी मनाई केली आहे. नियम‌ मोडुन जल्लोष करणारे उमेदवार व कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.  जिल्हाधिकारी यांचा आदेश..👇🏻👇🏻👇🏻
इमेज
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार _-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती           मुंबई,/ प्रतिनिधि :- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.           पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्था...
इमेज
सावकाराच्या ञासाला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या... पंढरपूर / प्रतिनिधि : व्याजाने दिलेल्या पैशाचे वसुलीसाठी ञास दिलेने रांझणी ता पंढरपूर येथील अरुण ज्ञानेश्वर माळी यांनी औषध पिवुन आत्महत्या केली. याबाबत तिघांजणाविरोधात तालुका पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, मागील सहा महिन्यापासून ते  24 डिसेंबर पर्यंत रांजणी तालुका पंढरपूर येथील  नागनाथ पवार, महेश अशोक दांडगे, साहेबराव घाडगे यांनी  पैशासाठी तगादा लावत मानसिक ञास दिला. त्रासास कंटाळूनच फिर्यादीचे वडील अरुण ज्ञानेश्वर माळी वय 55 वर्ष यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.    याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे नं 622/20 20 भादवि कलम 306,506,34 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39,42 प्रमाणे  मुलगा अभिजित माळी  यांनी गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत
इमेज
भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक सोनालिका 26 HP ट्रॅक्टरचे ऑनलाइन पद्धतीने लॉंचिंग- अभिजीत पाटील पंढरपूर / प्रतिनिधि :  येथील डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे भारतातील पहिल्या इलेक्ट्रीक सोनालीका 26एच पी या टॅक्ट्ररच्या ऑनलाईन पद्धतीने लाॅचिंग करण्यात आले आहे यावेळी अभिजीत पाटील, कुलदिपसिंग सर, बलजिंदर सिसोदीया, अशितोष सिंग, सुरेंद्रर ठाकूर व अभिजीत कदम व मॅनेजर सोमनाथ केसकर यांची उपस्थित होती.  राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सोनालिका इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे ऑनलाईन पध्दतीने लाॅचिग करण्यात आले असून याट्रॅक्टरची बुकिंग आजपासून सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होऊन फवारणी आणि शेतीच्या मदतीला आता घरीच शेतकऱ्यांना मदत होईल. हा ट्रॅक्टर घरीच चार्जिंग करू शकतो, ट्रॅक्टरचा चालू केल्यानंतर आवाज येत नाही, त्याचबरोबर या ट्रॅक्टरचा मेंटेनेस खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा आहे.ट्रॅक्टर ताशी 24.99 किलोमीटर या वेगाने धावतो या ट्रॅक्टर मुळे प्रदूषण होत नाही असा हा पहिलाच इलेक्ट्रि...
इमेज
मद्यधुंद ऊस वाहतुक टॅक्टरचालकाने घेतला  एकाचा बळी...   उपरी येथील घटना  पंढरपूर / प्रतिनिधि : मद्यधुंद ऊस वाहतुक टॅक्टरचालाकाने माॅर्निंग वाॅकला गेलेल्या इसमाला जोराची धडक दिली. यामध्ये तुकाराम आत्माराम नागणे वय ७५ रा उपरी यांचा जागीच मृत्यु झाला. हि घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली.     सध्या ऊस गळीत हंगाम सुरु आहे. ऊस वाहतुक वाहने भरधाव वेगाने जात आहेत. टॅक्टर ड्रायव्हर देखील दारु पिवुन वाहन चालवित असलेने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.  मद्यधुंद टॅक्टर ड्राइवर    हा अपघात एवढा भीषण होता की डोक्यावरुन दोन्ही  टेलरची सर्व चार   टायर गेलेने  जागीच मृत्यु झाला. आंबे ता पंढरपूर येथील टॅक्टर असलेची प्राथमिक माहिती मिळत आहे.  मयत नागणे हे पंढरपूर येथील पुजा ज्वेलर्सचे मालक सुभाष नागणे यांचे वडील व हनुमान दुध डेअरीचे चेअरमन पैलवान साहेबराव नागणे यांचे चुलते होते

लहान बाळांच्या हृदयरोगावर पंढरीत होणार मोफत उपचार...

इमेज
डाॅ शितल शहा यांच्या पुढाकाराने तज्ञ डाॅक्टर करणार उपचार पंढरपूर / प्रतिनिधि :  लहान‌ बाळांच्या हृदयरोग व अन्य गंभीर आजारावर पंढरपूर मध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. शहरातील तज्ञ डाॅ शितल शहा यांच्या पुढाकाराने प्रत्येक रविवारी मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबीर व आॅपरेशन खर्च देखील‌ मोफत करण्यात येणार असलेचे डाॅ शितल शहा यांनी पञकार परिषदेत सांगितले.  ० ते १८ वर्षातील  लहान बाळाच्या हृदयाचे छिद्र बंद करण्यात येणार आहे. मुंबई नंतर पंढरपूर मध्ये हे एकमेव सेंटर सुरु झालेने नागरिकांची सोय होणार आहे.  बाळ निळसर पडणे, वजन न वाढणे, जोरजोरात श्वास लागणे, दुध व्यवस्थित न पिणे, दुध पिताना कपाळावर घाम येणे, वारंवार न्यूमोनिया होणे, हृदयाचे जन्मता छिद्र असणे, ओपनहार्ट शस्ञक्रिया,  फुफसाचे आजार, किडनीचे आजार, मेंदुचे आजार यासह इतर सर्व आजारांवर उपचार करण्यात येत आहेत.  पुणे येथील तज्ञ डाॅ संतोष जोशी हे प्रत्येक रविवारी पंढरपूर मध्ये येवुन या  शिबीरातील बाळांची तपासणी करणार आहे...