पोस्ट्स

स्कुलबसवर परिवहन विभागाची कारवाई

इमेज
पंढरपूर / प्रतिनिधि :  अवैधरित्या पंढरपूर शहर व तालुक्यातून विद्यार्थ्यांची वाहतुक करणारे स्कुलबसवर परिवहन (RTO) विभागाने कारवाई सुरु केली आहे. आज अखेर पंढरपूर शहर व तालुका परिसरातील एकुण 76 वाहनांवर कारवाई केली आहे. याचबरोबर संपुर्ण सोलापुर जिल्ह्यातील ६०३ वाहनांवर कारवाई करीत ६३ वाहने जप्त केली असून तब्बल ६ लाख ४० हजार ४५० रुपयांचा दंड केला  असल्याची माहिती परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली .  याबाबत अधिक माहिती अशी की,वेळोवेळी स्कुलबस धारकांना वाहनांची तपासणी करून घेण्याबाबत कळवले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळालेला होता मात्र अजून बऱ्याच स्कुलबस तपासणी साठी आलेल्या नाहीत त्यासाठी मा परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार व मा उप प्रा परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहा प्रा प अधिकारी अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबवण्यात आली.   सुट्टीच्या दिवशीही (शनिवार व रविवारी) अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करून स्कुलबस योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम कार्यालयात सुरु ठेवले आहे. विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी या पुढेही अशी मोहीम रा...

सीआयडीचे पोलीस असल्याचे सांगत लुटले सोने

इमेज
वाखरी येथे भर दिवसा घडली घटना   पंढरपूर / प्रतिनिधी :  मी सीआयडीचा साहेब आहे,  गांजा विकणारा माणूस आम्ही शोधत आहोत असे म्हणत वाखरी तालुका पंढरपूर येथे बुधवारी दुपारी दीड वाजता एक लाख 75 हजारचे सोन्याचे दागिने  लुटल्याची घटना घडली.  याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.  याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की उपरी तालुका पंढरपूर येथील अंकुश रामचंद्र मोहिते हे नातेवाईकांच्या लग्नासाठी किसन नागणे यांच्यासोबत शेगाव दुमाला तालुका पंढरपूर येथे गेले होते.  लग्नकार्य उरकून परत गावाकडे जात असताना दुपारी दीड वाजता  वाखरी चौकाच्या अलीकडील चिंचेच्या झाडाजवळ काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकल वरून पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने गाडी थांबवण्यास सांगितले.  गाडी थांबवल्यानंतर त्या व्यक्तीने रस्त्याने चालत जाणाऱ्या एका व्यक्तिस थांबवून त्याचे किसे तपासले व गळ्यातील चैन काढून रुमालात बांधून त्याच्याकडे दिली.  यानंतर मी सीआयडी चा साहेब आहे गांजा पुड्या विक...

जागेच्या वादातून केला खून पंढरपूर तालुक्यातील घटना

इमेज
   जागेच्या वादातून खून : पाच जणांवर गुन्हा दाखल पंढरपूर / प्रतिनिधी : लक्ष्मीटाकळी ता पंढरपूर येथील हाॅटेल वैभवराजच्या जागेच्या कारणावरुन रविकांत प्रतापसिंह पाटील यांच्या मोटारसायकलला  इनोव्हा कारने धडक देवून अपघाताचा बनाव करीत खून केला. याप्रकरणी हाॅटेलचालक परमेश्वर देठे,  दोन मुले स्वप्निल उर्फ रणजित देठे, प्रशांत देठे, पुतण्या नितीन देठे, सर्व रा लक्ष्मीटाकळी यांचेसह कामगार विजय बलभिम कोळेकर रा फुटरस्ता कोर्टी यांचेविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पो नि मिलींद पाटील यांनी दिली. याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, हाॅटेलच्या जागेच्या कारणावरुन जागा मालक प्रतापसिंह सर्जेराव पाटील  व  हाॅटेलचालक परमेश्वर देठे यांच्यात वाद सुरु होता. या वादातुन एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनला तक्रारी देखील दाखल आहेत. मंगळवारी सकाळी रविकांत पाटील हे कामानिमित्त मोहोळला जात असताना पाळत ठेवून पाठलाग करीत इनोव्हा एम एच १४ सी एस ७३५१ ने मोटारसायकल एम एच १३ सी एच ९६९२ ला पाठीमागून जोराची धडक देत २०० फुट रोडवर फरफटत नेले. अपघाताचा बनाव करीत खून केला.  ही घटना सकाळी ९ ...

विठ्ठल कारखान्यामध्ये सत्तांतर

इमेज
  " विठ्ठल " मध्ये परिवर्तन उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या गटाचा विजय पंढरपूर / प्रतिनिधी : तालुक्याचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. सोलापुर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या गटाचे २१ पैकी २० उमेदवार विजयी झाले. तर भालके - काळे गटाचे संस्था मतदार संघातून समाधान काळे हे एकमेव विजयी झाले. याचबरोबर युवराज दादा पाटील यांच्यासह विद्यमान चेअरमन भगिरथ भालके गटाचा  पराभव झाला. विठ्ठलसह सहकार शिरोमणी कारखान्याच्या शेतक-यांची थकलेली ऊसबिलामुळे काळे - भालके गटाला फटका बसल्याचे बोलले जात आहे भाळवणी गट मोहन बागल ६९४२, रुक्मीणी बागल ६६२७, विलास देठे ६४८५, मधुकर गिड्डे ६९६२, धनंजय काळे ८३२७, अरविंद लोकरे १४, मोहन लोकरे २०,  साहेबराव नागणे ८३१५, कालिदास पाटील ८१६५, दिपक पवार ७००८, बाळासाहेब यलमर ६२६०  तर भाळवणी गटात ३७४ मते बाद झाली. करकंब गट मारुती भिंगारे ६६८१, जिवराज चव्हाण ५५, रामकृष्ण जवळेकर ७०१०,  दशरथ खळगे ६४१२, शहाजी मुळे ६६६६, नवनाथ नाईकनवरे ८५००, दत्ताञय नरसाळ...

पोलीस चौकीतच लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई

इमेज
प्रातनिधिक चिञ   सोलापूर / प्रतिनिधी : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी बारा हजार रुपयांची लाच घेताना सदर बजार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सूर्यकांत क्षीरसागर वय 34 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.  धक्कादायक बाब म्हणजे सदर बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या रेल्वे टेशन पोलीस चौकीमध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ माजली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापुर रेल्वे स्टेशन पोलीस चौकी परिसरात तक्रारदार व त्यांच्या ओळखीच्या इसमांच्या गाड्या प्रवाशी वाहतुक करणेकरीता उभा असतात. या गाड्यांवर कोणतीही कारवाई न करणेसाठी उपनिरीक्षक प्रशांत श्रीरसागर यांनी मासिक हप्ता म्हणून १३ हजारांची मागणी करीत १२ हजार स्विकारले. ही लाच रेल्वे पोलीस चौकीमध्येच स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उप अधीक्षक संजीव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रकांत कोळी, शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, प्रमोद पकाले, उमेश पवार, शाम‌ सुर...

सुपलीच्या व्यक्तीचा लातुर जिल्ह्यात खून ! एका महिलेसह दोघे पोलीसांच्या ताब्यात

इमेज
                      पंढरपुर / प्रतिनिधी : सुपली ता पंढरपूर येथील भानुदास जगनाथ माळी वय ६० यांचा  लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात खून झालेने  एकच खळबळ माजली आहे. भानुदास माळी हे २८ मे रोजी दुपारी १२.३० हे पंढरपुरातून    पैसे घेवून येतो म्हणून  घरातून गेले होते. माञ  ते परत न  आलेने नातेवाईकांनी सर्वञ शोध घेतला. माञ ते सापडले नसलेने नातेवाईकांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला हरवलेबाबत तक्रार दिली. तक्रार दाखल  होताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शानाखाली पो नि धनंजय  जाधव यांनी स्वतः तपासाची चक्रे फिरवली. भानदास माळी' हे ज्यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गेले होते, त्या व्यक्तींकडे पोलिसांनी चौकशी  केली आणि एका महिलेसह एका तरुणास निलंगा पोलिसांनी ताब्यात  घेत अटक केली आहे.  निलंगा येथील पोलिसांनी अटक केलेली महिला व पुरुष याबाबत निलंगा पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार निलंगा लातुर ते जहीराबाद मार्गावरील पानचिंचोलीवर येथे ३० मे रोजी रोडच्या कडेला एका अनोळ...

अबब...! १४ वर्षाच्या मुलीचा लावला विवाह २०० लोकांवर गुन्हा दाखल

इमेज
  खर्डी येथील घटना : पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई पंढरपूर / प्रतिनिधी : खर्डी ता पंढरपूर येथील चव्हाण मळा येथे केवळ १४ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचा बालविवाह करण्यात आला. याची माहिती मिळताच पंढरपुर तालुका पोलीसांनी घटनास्थळी जावून कारवाई केली. याचबरोबर या अल्पवयीन मुलीचे नातेवाईक, नवरदेवाचे नातेवाईक, फोटोग्राफर, लग्न लावणारे भटजी, ग्रामपंचायत सदस्य यांचेसह लग्नास उपस्थित असणारे सुमारे २०० लोकांविरोधात ग्रामसेवक भगवान कुलकर्णी यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पो नि मिलींद पाटील यांनी दिली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.  पंढरपूर तालुक्यात कोठेही बालविवाह होत असतील तर नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन तालुका पोलीसांनी केले आहे. याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, खर्डी येथे बालविवाह झाल्याची माहिती पोलीसांना समजताच ग्रामसेवक भगवान कुलकर्णी व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नवरी मुलगी ही १८ वर्षापैक्षा कमी वयाची असल्याचे निदर्शनास आले. नवरी मुलीच्या वडिलांकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देवू लागले. मुलीचा जन्मदाखला प्राप्त केलेवर ...

अखेर विठ्ठल कारखान्याची निवडणुक जाहीर

इमेज
पंढरपूर/ प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्याचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या गुरसाळे तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला.  यानुसार 5 जुलै रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ३ जून ते ९ जून या कालावधीत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत १० जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे १३ ते २७ जून पर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी कालावधी असून २८ जून रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे. 5 जुलै रोजी मतदान होणार असून 6 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुदत संपली असतानाही निवडणूक लांबणीवर पडली होती आणि ही निवडणूक लवकर व्हावी अशी काही संचालक आणि सभासदांचीही मागणी होत होती. काही पदाधिकारी यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यानाही भेटलेले होते. अनेकांना या निवडणुकीची प्रतीक्षा लागलेली असतानाच आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात ...

रक्त सांडू... पण हक्काचे एक थेंब पाणी देणार नाही....

इमेज
  उपरीत रस्ता रोको आंदोलन प्रसंगी स्वाभिमानीचा निर्धार .. उपरी ता.पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लाकडी निंबोडी योजनेंतर्गत पाणी नेण्यास विरोध म्हणुन सोमवारी सकाळी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.  यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, तालुकाध्यक्ष सचिनजी पाटील, युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल, पक्षाचे तालुकाध्यक्ष पै साहेबराव नागणे, जि.कार्याध्यक्ष सचिन आटकळे, मनोज गावंधरे, बाहुबली सावळे, शहाजी जगदाळे, सुशिलकुमार शिंदे, सचिन घोडके, श्रीनिवास नागणे, अमित नागणे आदींसह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल म्हणाले, जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळवुन नेवून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना हिसका दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यावेळेस बोलताना तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पालकमंत्री हे शेतकर्यांची कशी दिशाभूल करत आहेत याचा पाढा वाचला. एकीकडे जिल्ह्यातील योजनांना निधी मिळत नाही मात्र दुसरीकडे एका रात्रीत या योजनेला नि...

पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

इमेज
पंढरपूर / प्रतिनिधी : – रयत शिक्षण संस्थेचे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय हे सोलापूर जिल्ह्यातील व रयत शिक्षण संस्थेतील एक नामांकित  महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात रविवार दि. १५ मे रोजी सकाळी १०:३० वाजता ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी दिली.         सोलापूर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले असून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील होत असलेले सर्व बदल महाविद्यालय स्वीकारत असून राष्ट्रीय महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत ६७ वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सेवा सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय प्रशासन प्रयत्नशील असते. महाविद्यालयाच्या विकासाची वाटचाल माजी विद्यार्थ्यांना समजावी व या विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेता यावे. या उद्देशाने रविवार दि. १५ मे र...