पंढरपुर - मोहोळ महामार्ग वाहतुकीसाठी बंद
कुंभार घाटाजवळील भिंत कोसळुन ६ जणांचा मृत्यु : शहर व तालुक्यात पावसामुळे जनजिवन विस्कळीत पंढरपूर / प्रतिनिधि : मंगळवारी राञीपासुन पंढरपुर शहरासह तालुक्यात सुरु झालेला पाऊस बुधवारी दिवसभर सुरु आहे. तालुक्यातील ओढे, नाले दुथडी भरुन वाहत असुन नारायण चिंचोली येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने पंढरपूर - मोहोळ महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. यामुळे नागरिकांनी पंढरपूर - रोपळे - शेटफळ या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन तालुका पो नि किरण अवचर यानी केले आहे. या सततच्या पाऊसामुळे भिमा नदी दुथडी भरुन वाहत असुन जुना दगडी पुल पाण्याखाली आहे. धरण परिक्षेञात पाऊस सुरु असलेने उजनी व वीर धरणातुन २ लाख २५ हजार क्युसॆस पाणी भिना नदी पाञात सोडण्यात आलेने नदिकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे पंढरपूर ला पाहणी करणेसाठी येत होते. माञ नारायण चिंचोली येथील पुलावर पाणी आलेने ते परत सोलापुरला गेले. बुधवारी सायंकाळी पंढरपुरमध्ये ३५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता. माञ उजनी...